१. सर्वप्रथम क्रोम ब्राऊझर वर जाऊन Google forms टाईप करावे.
२. गुगल फॉर्म ओपन होईल , go to Google form त्यावर जाऊन + या ऑप्शन वरून नवीन गुगल फॉर्म ओपन करावा.
३. गुगल फॉर्मवर क्विझ तयार करावयाची असल्यामुळे फार्म ओपन होताच फॉर्मच्या सेटिंग मध्ये जावे तेथे 3 विंडो असतील . त्यामध्ये पहिली जनरल , दुसरी प्रेझेंटेशन आणि तिसरी क्विझची असेल. क्विझ वर क्लिक करा .
४. Make this quiz हे ऑप्शन ऑन करा व सर्वात खाली जाऊन सेव्ह करून घ्या . आपण क्विझ तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकलेले आहे.
५. जो untitle form आलेला आहे त्याला नाव द्या व डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या वर्गाची , कोणत्या धड्यावर आधारित क्विझ आहे ते टाकायला विसरू नका .
६. किमान दहा प्रश्न क्विझ मध्ये असणे अनिवार्य आहे त्यासाठी प्रश्नाचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मल्टिपल चॉइस , ड्रॉप-डाऊन , चेक बॉक्स किंवा शॉर्ट आन्सर घेतल्यास उत्तम .
७. मल्टिपल चॉइस घेतल्यास उत्तरा दाखल कमाल चार पर्याय निवडणे गरजेचे आहे .
८. प्रत्येक प्रश्नाच्या खाली आन्सर की असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करून बरोबर उत्तर निवडायची आहे तसेच उजव्या बाजूला पॉईंट्स लिहिलेले आहे तिथे त्या प्रश्नाचे गुण द्यायचे आहेत.
९. डाव्याबाजूला आंसर फीडबॅक असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा , करेक्ट आन्सर लिहिलेले असेल ते निवडून आपला फीडबॅक आपण नोंदवू शकतो . म्हणजे विद्यार्थ्यांचे उत्तर जेव्हा बरोबर येईल तेव्हा आपण नोंदविलेला फीडबॅक त्यांना दिसेल .
१०. त्यानंतर ही क्विझ सेंड करायची आहे . त्यानंतर आलेली लिंक शॉर्ट करून कॉपी करायची आहे व व्हाट्सअप वर या भागाशी संबंधित एक पोस्ट तयार करून आपल्याला आपआपल्या गृप वर सेंड करायची असते.
११. रिस्पाॅसेस मध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांची उत्तरे पाहू शकतो.
No comments:
Post a Comment